वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम

| नवीन पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेलमध्ये संपन्न झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नवीन पनवेल सेक्टर 6 येथील जीसी अस्पिरा 206 सोसायटीच्या व्यवस्थापन समितीमार्फत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कडुलिंब, उंबर, वड ,जांभूळ, बकुळी, आंबा, गुलमोहर, अशोक, अशा विविध प्रकारच्या 100 हून अधिक वृक्षांची रोपण करण्यात आले असून या वृक्षांच्या संवर्धनाची कायम स्वरूपी जबाबदारी ही सोसायटीतील सदस्यांनी घेतली आहे. सदर कार्यक्रमासाठी सोसायटीचे अध्यक्ष बळीराम साबळे, सचिव विशाल टोपकर, डी के सिंग प्रशांत खांडवे, विशाल वटकर, अरविंद गायकवाड, मिलिंद खंदारे, नरेश मोकर व इतर सोसायटीत सदस्य हजर होते. या उपक्रमामध्ये सोसायटीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version