| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील प्रा.शाळा उसर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. या निमित्ताने मुख्याध्यापक सुधीर पाटील, विषय शिक्षक संतोष यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी केलेले कार्य चिरकाल स्मरणात राहणारे असून कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान शेतकर्यांसाठी संजीवनी देणारे आहे असे प्रतिपादन श्री संतोष जाधव सर केले. वसंतराव नाईक यांनी कृषी औदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकर्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून 1 जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करतो असे मनोगत सहा. शिक्षक संजय चव्हाण यांनी वक्त केले.