वडघरला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात वृक्षारोपण

। माणगाव । प्रतिनिधी ।
सामाजिक वनीकरण विभागातर्फे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात सोमवार वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनपाल बी. टी. पवार , एस.सी. धायगुडे व वनरक्षक ए. एस. सोनवणे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक राकेश गायकवाड,शिबिरप्रमुख सुमित प्रतिभा संजय,सखाराम राऊळ व स्वदेश फाऊंडेशन टीम व मान्यवर उपस्थित होते. हर घर तिरंगासोबत हर घर संविधान हे अभियान सुद्धा राबवावे असं आवाहन वनपाल बी. टी. पवार यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना संविधान ग्रेट भेट हे पुस्तक साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले.

Exit mobile version