वन जमिनीसह आदिवासी वाड्यांवर वृक्षारोपण

। पनवेल । प्रतिनिधी ।
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत किशोर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसह पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील मोकळी वन जमिन व कोरलवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्यालगत अंबा, जांभूळ, चिंच, पिंपळ, बदाम ह्या जातींची फळझाडे लावून वृक्षारोपण करून साजरा केला. यावेळी संतोष ठाकूर, सुनीता पाटील, नरेंद्र पाटील, लक्ष्मण पवार,राजेश रसाळ, तेजस चव्हाण, मानसी पाटील, गुरुदास वाघे, संतोष पवार, सचिन पाटील, सतीश मोकल अनंत ठाकूर, सिद्धेश चव्हाण, सचिन वाघे, भानुदास वाघे, अब्रार मुल्ला यांच्यासह बालग्राम मधील बालके उपस्थित होते यावेळी किशोर पाटील यांनी बालग्राम मधील एका विद्यार्थ्याचे वार्षिक पालकत्व स्वीकारत असल्याचेही सांगितले.

Exit mobile version