| तळा | वार्ताहर |
स्वच्छ भारत अभियानांतर्गत व माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत तळा नगरपंचायतीार्फत शहरातील बाजारपेठेत एकेरी प्लास्टिक बंदी नागरिकांमध्ये जनजागृती करून दंडात्मक कारवाईची नोटीस देऊन समज देण्यात आली. ही मोहीम (दि.10) एप्रलिपासून राबविण्यात येत आहे.
दरम्यान, पहिली दंडात्मक कारवाई 5000/- रुपये, दुसरी दंडात्मक कारवाई 10,000/ – रुपये, तिसरी दंडात्मक कारवाई 25,000/- रुपये , कलम 3(1)(1) अन्वये 3 महिने कैद असा शासनाचा आदेश असून, दिलेल्या नोटिशीप्रमाणे पालन केल गेले नाहीतर होणार्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी नोटीस देण्यात आली आहे. मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. याकामी स्वच्छता निरीक्षक दीपक वडके, लिपिक केतकर व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
