| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएल स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया रविवारी (ता. 6) मुंबईमधील हॉटेल ताज पॅलेसमध्ये पार पडली. ही स्पर्धा 6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये नवी मुंबई-कोपरखैरणे येथील भूमिपूत्र मैदानामध्ये रंगणार आहे.
स्पर्धेच्या आयोजकांनी आणि त्यासाठी समर्पित भावनेने झटणार्या सर्वांच्या योगदानातून आतापर्यंत या स्पर्धेचे तीन हंगाम यशस्वी झाले आहेत. एनएमपीएल स्पर्धेने नवी मुंबईकरांना जोडले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे एनएमपीएल कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणार्या संदीप नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संघ मालकांचादेखील गौरव करण्यात आला.
खेळाडू लिलाव प्रक्रियेचे सूत्रसंचालन समालोचक कुणाल दाते यांनी केले. यावेळी दीपक पाटील, स्वप्नील नाईक, ओमकार नाईक, टोनी मढवी, उमेश म्हात्रे, मस्कर, भूषण पाटील, मनोज, प्रतीक पाटील, महेंद्र पाटील, नीलेश पाटील, अजिंक्य पाटील, चेतन पाटील, रमेश मढवी, पंच विजय पाटील, रवी म्हात्रे, भिकाजी मोकल, माजीद बलोच, तुषार पाटील, विकास मोकल, एल. डी. पाटील, मनोज म्हात्रे, ऋषिकेश वैद्य, योगेश वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
संघ पुढीलप्रमाणे
कुकशेत अवेंजर्स, पार्थ रॉयल बोनकोडे, वाशी इंडियन्स, परी इलेव्हन, वन सोल्युशन करावे, वरद लॉजिस्टिक, साईप्रसाद गोठवली, अथर्व चॅलेंजर्स सानपाडा, शिरवणे प्रतिष्ठान, इच्छापूर्ती वाशी गाव, टोनी टायटन्स, जय मल्हार फायटर्स, एमपी वॉरियर्स कोपरखैरणे, टायटन नवी मुंबई, डी. आर. पाटील वॉरियर्स, किरण इलेव्हन शिरवणे.
624 खेळाडूंचा लिलाव
एनएमपीएल स्पर्धेसाठी एकूण 624 खेळाडूंचा लिलाव पार पडला. यापैकी 240 खेळाडूंवर बोली लावून संघमालकांनी त्यांना आपल्या संघासाठी निवडले. स्पर्धेमध्ये 16 संघ अजिंक्यपदासाठी लढणार आहेत. लिलावामध्ये सात खेळाडूंना सर्वोच्च 12 हजार रुपयांची बोली लागली. अजिंक्यपद मिळवणार्या संघाला दोन लाख रुपये रोख, उपविजेत्या संघाला दीड लाख रुपये रोख आणि तृतीय क्रमांक मिळवणार्या संघाला एक लाख रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय सर्वोत्तम कामगिरीसाठी खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसेदेखील देण्यात येणार आहेत.