पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लघू उद्योगाला भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्यूकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागांतर्फे विद्यार्थ्यांसाठी गुरूवारी (दि.26) क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही क्षेत्रभेट अलिबाग येथील देवकृत घाणा तेल प्रक्रिया उद्योग येथे आयोजित केली होती. यावेळी देवेंद्र नागोठकर यांनी, बाजारातील पाम तेल आणि घाण्यावर तयार केलेले तेल या दोघांमध्ये असलेला फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तेल तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचे स्रोत, तेल तयार करताना आवश्यक तापमान, हे तेल आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे याचे सोदाहरण स्पष्टीकरण त्यांनी दिले. विलास कावजी यांनी, घाण्यावर तेल तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना दाखवून दिली. या क्षेत्र भेटीसाठी कला व वाणिज्य विभाग प्रमुख रसिका म्हात्रे, सहा. प्रा. जयश्री ठाकूर, कला व वाणिज्य विभागातील प्रथम, द्वितीय वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version