पीएनपीच्या विद्यार्थ्यांना मिळाले ‌‘चंद्रयान 3’चे अनुभव

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील जॉग्राफी, फिजिक्स व कॉम्प्युटर सायन्स विभागांतर्गत, expert talk on Mission Chandrayaan 3 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणात सहभागी असलेले चिन्मय संदीप म्हात्रे (junior scientist ISRO) हे उपस्थित होते.

या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे चंद्रयान 3 या मिशन अंतर्गत अनुभव व्यक्त केले, तसेच काही स्लाईडद्वारा विद्यार्थ्यांना अनुभव देण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालय प्रा. रवींद्र पाटील, प्रा. डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. सुजित पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा. कैलास सिंग राठोड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनेश पाटील यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. केतकी पाटील यांनी केले. आभार प्रा. कैलास सिंग राठोड यांनी मानले.

Exit mobile version