पीएनपी समर स्विमिंग कॅम्पचा शुभारंभ

माजी सरपंच नंदुशेठ मयेकर यांच्या हस्ते उद्घाटन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पीएनपी एज्युकेशन सोसायटीची सायरस पुनावाला सीबीएसई स्कूल नागाव येथे एक महिनाभर सुरू असणार्‍या समर स्विमिंग कॅम्पचे उद्घाटन नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदुशेठ मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

दि. 8 मे ते 7 जून या कालावधीत सुरू असणार्‍या समर स्विमिंग कॅम्पमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या वयोगटाच्या महिला व पुरुष यांनासुद्धा आता अल्पदरात पोहणे शिकणे सुलभ झाले आहे. याकरिता अनुभवी प्रशिक्षकसुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. स्विमिंग कॅम्पकरिता नाममात्र फी आकारण्यात आली असून, अलिबाग ते नागाव बसची सुविधासुद्धा देण्यात आली आहे. या समर कॅम्पला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



या उद्घाटनप्रसंगी नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर, उपसरपंच रसिका प्रधान, सदस्या हर्षदा मयेकर, पुरोगामी युवक संघटनेचे विभाग प्रमुख सचिन राऊळ, रेवदंड्याचे शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद वरसोलकर, सुरेश खोत, शरद पाटील, पीएनपी सायरस पुनावाला सीबीएसई स्कूल नागावच्या मुख्याध्यापिका रसना व्यास, इंग्रजी माध्यमाच्या कोओर्डीनेटर श्रुती सुतार, कोओर्डीनेटर राजेश्री पाटील, पीएनपी कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, मुख्य अकाऊंटंट मनिषा रेलकर, दिनेश मानकर, पालक व प्रशिक्षणार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version