अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पीएनपी कलाविकास मंडळ अलिबाग अंतर्गत साहित्यप्रभा आयोजित अलिबागमध्ये काव्य संमलेनाचे आयोजन करण्यात आले आहे. पीएनपी एज्युकेशनच्या मुख्य कार्यालयात रविवारी (दि.10) सकाळी 10.00 वाजता हा सोहळा रंगणार आहे. या काव्यसंमेलनामध्ये 50 हून अधिक कवींचा सहभाग असणार आहे. यावेळी ‌‘माझी आठवणीतील शाळा‌’, ‌‘हरवलेलं बालपण‌’ आणि ‌‘माती‌’ या तीन विषयांवर संमेलन होणार आहे. हृदयस्पर्शी विषयांवर कवितांचे सादरीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छूक कवींनी त्यांच्या कविता मंडळाकडे आगाऊ पाठवाव्यात, असेही सांगण्यात आले आहे. आपल्या लेखणीतील उमटणाऱ्या आठवणींची ही एक सुंदर पर्वणी ठरणार आहे. या काव्य संमेलनामध्ये मोफत प्रवेश असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Exit mobile version