। जेएनपीटी । अनंत नारंगीकर ।
चायनिज फ्राय राईस खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना उरण येथे बुधवार दि. 22 रोजी घडली. या प्रकरणी मोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चायनिज चालक दिपक रमेश थळी आणि कामगार अर्जून सत्येन्द्रनाथ गोष या दोघांवर मोरा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आजोळी मामाच्या गावाला केगाव येथे ही मुले आली होती. आजोबांकडे चायनिज खाण्याचा हट्ट केल्यामुळे आजोबांनी बुधवारी रात्री उरण, एनआय हायस्कूल जवळील संजू चायनिज येथून या मुलांसाठी फ्राय राईस घेवून आले. मात्र हे आणलेले फ्राय राईस खाल्यानंतर या मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होवू लागला. त्यांना तातडीने उरण येथिल इंदिरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.
ध्या सदर मुलांवर उपचार सुरू आहेत. चायनीज पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झालेल्या मुलांची नावे सुजल सुजित पाटील (7) रा. पाणदिवे, रिता सत्यंद्र ठाकूर (38), सिद्धार्थ सत्येंन्द्र ठाकूर (11) रा. केगाव, अवेडा, अर्णव भरत पाटील (9) रा. कुंभारवाडा उरण, सिया निलकमल थळी (9) रा.) करंजा, सानिया सुनिल म्हात्रे (15) रा. बोरी, आर्या सुनिल म्हात्रे (4) रा. बोरी यांना पोटाचा आणि उलटी, जुलाबाचा त्रास झाला होता. सध्या या मुलांची प्रकृती स्थिर असून मोरा पोलिस अधिक तपास करत आहेत.