पोलादपूर नगरपंचायत- 19 उमेदवारी अर्ज दाखल

पोलादपूर | प्रतिनिधी |
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे सर्वाधिक 10 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षातर्फे 6 उमेदवारी अर्ज, शिवसेनेतर्फे 2 तर अखिल भारतीय सेनेतर्फे 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.
प्रभाग 17 मधून दिलीप भागवत, 11 मधून स्वप्नील भुवड, 9 मधून तेजश्री अभिषेक गरुड आणि शर्मिला सचिन दुदुस्कर, 8 मधून अस्मिता राजन जांभळेकर, प्रभाग 3 मधून निखिल पांडुरंग कापडेकर, 4 मधून प्रतिक्षा प्रमोद शिंदे, 5 मधून अर्पणा अमित कदम, प्रभाग 14 मधून प्रकाश लक्ष्मण भुतकर आणि प्रभाग 2 मधून कल्पेश सुखलाल मोहिते आदी 10 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
शिवसेनेकडून प्रभाग 1 मधून माजी नगराध्यक्षा सुनीता ज्ञानदेव पार्टे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर अस्मिता उमेश पवार यांनी प्रभाग 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे तालुका अध्यक्ष प्रसन्ना दगडू पालांडे यांनी प्रभाग 13 मधून, शीला पंकज बुटाला प्रभाग 4 मधून, रश्मी राजा दिक्षित प्रभाग 6 मधून, अंकिता अरविंद जांभळेकर यांनी प्रभाग 14 मधून तर एकनाथ नारायण कासुर्डे यांनी प्रभाग 15 मधून तर निलेश विजय आंबेतकर यांनी प्रभाग 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणुकीमध्ये प्रथमच महेंद्र श्रीपती जाधव या उमेदवाराने प्रभाग 13मधून डॅडी अरूण गवळी प्रणित अखिल भारतीय सेनेतर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामुळे नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पारंपरिक काँग्रेस व शिवसेना या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांखेरिज राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष असे पाच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात दिसून येणार आहेत.

Exit mobile version