पोलादपूर पोस्ट ऑफिसचे कामकाज ठप्प

इंटरनेटर सेवेच्या मशिनमध्ये बिघाड
जनतेची आतोनात गैरसोय
पोलादपूर । वार्ताहर ।
पोस्ट ऑफिसमध्ये इंटरनेट सुविधेच्या यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेले आठ दिवसापासून पोस्टाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे जनतेला गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्पीड पोस्ट आणि रजिस्टर या सेवेसाठी 20 किमी अंतरवर असलेल्या महाड पोस्ट ऑफिसला जावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
पोलादपूर तालुक्यात सहा बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालयांना सुद्धा यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी याबाबतीत जिल्हा अधिक्षक अलिबाग यांनी त्वरीत लक्ष्य देऊन इंटरनेट सोयी सुविधा पूर्ववत करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Exit mobile version