पोलादपूर प्रिमियर लिग कबड्डी स्पर्धा

आबासाहेब वॉरियर्स लोहारमाळ अंतिम विजेता
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुका प्रिमियर लिग कबड्डी स्पर्धेमध्ये लोहारमाळ आबासाहेब वॉरियर्स संघ अंतिम विजेता ठरला. दरेकर लायन्स संघ उपविजेता ठरला. यावेळी 565 किलो वजन उचलणारी वेटलिफ्टर प्रतिक्षा गायकवाड आणि यंदाचा आद्यपत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकारिता पुरस्कार विजेते शैलेश पालकर यांचा सत्कार पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश कदम, दशरथ उतेकर, बाबाजी उतेकर, दादा साळुंखे आणि अन्य पदाधिकारी तसेच आयोजक सरकार एसडी ग्रुपचे सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विद्युतप्रकाशझोतामध्ये सुरू असलेल्या या पीकेपीएल कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभ पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश कदम आणि अन्य पदाधिकारी उपस्थितीत करण्यात आला.

तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सरकार एबी ग्रुप आयोजित पोलादपूर कबड्डी प्रीमियर लीग(पीकेपीएल) 2023 पहिले पर्व ही लीग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अलिबाग, शहरातून अनेक गुणवंत नावाजलेले खेळाडू अनेक शहरातून सहभागी झाले तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पंच ही या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याने या स्पर्धांचे स्वरूप व दर्जा उच्च स्वरूपाचा राहिला. या स्पर्धेमध्ये लोहारे शिवकन्या मुलींनीही सहभाग घेतल्यामळे नियोजन आणि आयोजन कौतुकास्पद झाले. लिग स्पर्धेमध्ये दरेकर लायन्स संघ उपविजेता ठरला तर देशमुख 7 स्टार आणि संभाजी ब्रिगेड पोलादपूर या संघांना तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला. पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड, प्रकाश गायकवाड, आ.भरत गोगावले, चंद्रकांत कळंबे, निलेश अहिरे, चेतन उतेकर, हनुमंत जगताप तसेच अन्य मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित राहिले.शालेय क्रीडा स्पर्धेत वय वर्षे 14,17,19 या गटात जिल्हा स्तरावर पारितोषिक प्राप्त शाळांचा सन्मान करण्यात आला.

Exit mobile version