। पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर तालुक्यातील लोहारे, चांभारगणी, बोरघर, दिवील, कालवली, भोगावं खुर्द, धामणदिवी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज मतमोजणीनंतर जाहिर झाला असता महाविकास आघाडी, ग्रामविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेना यामध्ये सातही ग्रामपंचायतींच्या सत्तेचे विभाजन झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष चंद्रकांत सणस यांनी बोरघर ग्रामपंचायतीवर लालबावटा फडकवून महाआघाडीच्या यशाला आकार दिला आहे.
बोरघर येथे बंडू विठू पारधी यांनी थेट सरपंच पदासाठी सुनील कोंडीराम गायकवाड यांचा पराभव केला. या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदी मनिषा पारधी, नामदेव पार्टे, निवृत्ती कदम, गीता गोगावले, सुनंदा आंबले, चंद्राबाई उलालकर, नारायण उतेकर आदींची निवड झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे भाई एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, काँग्रेसचे दिलीप भागवत व तालुकाध्यक्ष अजय सलागरे, माजी तालुकाध्यक्ष अनंत पार्टे व अन्य महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.