बेलदार समाज क्रिकेट स्पर्धेत पोलादपूर संघास जेतेपद

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील श्री गणेश मित्रमंडळ मोर्बा (पवारवाडी) बेलदार समाज आयोजित भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोलादपूर क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात सातारा संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 50 हजार व आकर्षक चषक पटकाविले. त्यांना महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजुभाऊ साळुंखे व डोंबिवलीचे उद्योगपती सुनील मोहिते यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास समाजाचे राज्य कोषाध्यक्ष अनिल पवार, राजिपचे माजी सभापती अ‍ॅड.राजीव साबळे, मंडणगडचे उद्योगपती नितीन पवार, अल्ताफ धनसे, जितेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, अजय पवार, राकेश चव्हाण, शिवाजी मोहिते, राकेश पवार, सुनील पवार, संताजी पवार, अंकुश साळुंखे, सुरेश पवार, राजू मोरे, अरुण पवार, गुलाबराव पवार, अविनाश पवार, शिवाजी पवार, रोहिदास चव्हाण, साहेबराव पवार, सुनील चव्हाण, दिलीप पवार, विजय पवार, संजय चव्हाण, रोहिदास पवार आदी मान्यवरांसह क्रिकेट शौकीन व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बेलदार समाजाच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातील बेळगाव, सातारा, ठाणे, पुणे, जिंतूर, रायगड, बुलढाणा, रत्नागिरी, खेड येथून 20 नामवंत संघ सहभागी झाले होते.


या स्पर्धेतील उपविजेते सातारा संघास रोख रुपये 30 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते डोंबिवली संघास रोख रुपये 20 हजार रुपये व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले विसापूर संघास रोख रुपये 10 हजार रुपये व आकर्षक चषक देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज अविनाश मोहिते, उत्कृष्ट गोलंदाज विकास जाधव तर मलिकाविराच्या बहुमानासाठी कल्पेश मोहिते यांची निवड करण्यात आली. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मोर्बा येथील पंच निसार जालगावकर व सुहेल हर्णेकर यांनी पंचांची उत्कृष्ट कामगिरी बजावली.

Exit mobile version