। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील आयकॉन खेळाडू असलेल्या सुपर सिलेक्टर्स संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत थळ अलिबाग संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवीत अंतिम सामन्यात अप्पर तुडील संघाचा दारुण पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 51 हजार व आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. स्पर्धेतील उपविजेते अप्पर तुडील संघाला द्वितीय क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये 31 हजार व आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 32 संघानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
माणगाव जवळील निळगुण फाटा येथे अल्ताफदादा धनसे यांच्या भव्य मैदानावर सुपर सिलेक्टर्स माणगाव संघाने दि.10 ते 13 डिसेंबर यादरम्यान क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ए वन निजामपूर संघाने तृतीय क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये 21 हजार व आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले वाय.एम.सी.सी.वणी संघाने रोख बक्षीस रुपये 11 हजार व आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत वाय.एम.सी.सी वणी संघाचा मोहम्मद कैफ याला उत्कृष्ट फलंदाज तर उत्कृष्ट गोलंदाज थळ अलिबाग संघाचा गोलंदाज अशांक साखरकर याची निवड करण्यात आली. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून थळ अलिबाग संघाचा आदिल कुरेशी याची निवड करण्यात येऊन मालिकावीर बक्षिसासाठी अप्पर तुडील संघाचा खेळाडू रिहान लोरे याची निवड करण्यात आली. या स्पर्धेत यासिन मर्चंट अलिबाग, हरीश दिघीवकर दिघी, हर्षल मुंढे रोहा-किल्ला यांनी समालोचकाची भूमिका निभावली तर पंच म्हणून सुपर सिलेक्टर्स माणगावच्या सदस्यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे युट्युब चॅनेलवरून जय गणेश स्पोर्ट्स श्रीवर्धन मार्फत मयुरेश मयेकर यांनी प्रसारण केले होते तर डीजेचे कामकाज मालक दिनेश हरवंडकर व स्वप्नील यांनी पाहिले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास नितीन बामगुडे, अकबर परदेशी, सचिन बोंबले, प्रशांत साबळे, अॅड.सुशील दसवते, नितीन दसवते, प्रसाद धारिया, सागर मोरे, राकेश पवार, जावेद देशमुख, सचिन मनोहर देसाई, मयूर शेट, विश्वजित जाधव,राजू सुर्वे,दिनेश हरवंडकर,संजय मांढरे,सुनील पवार,दिनेश रातवडकर,गणेश विचारे,अकबर इसाने आदी मान्यवर उपस्थित होते.