गॅरेजचालकांविरोधात पोलिसांची कारवाई

| पनवेल । वार्ताहर ।

सार्वजनिक रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करून वाहनांची दुरुस्ती कणार्‍या दोन गॅरेजचालकांविरोधात खारघर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. हे दोन्ही गॅरेजचालक विनापरवाना वाहनदुरुस्ती करत होते. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या रस्त्यावरून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

खारघरमध्ये काही गॅरेजचालक मालक हे रस्त्यावर बेकायदा वाहने पार्किंग करून वाहनांची दुरुस्ती करत असल्यामुळे इतर वाहनांना त्याचा अडथळा निर्माण होत होता. अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन खारघर पोलिसांनी खारघर, सेक्टर-3, बेलपाडा येथील गॅरेज लाईनमध्ये जाऊन पाहणी केली. या वेळी खारघरहून सीबीडीकडे जाणार्‍या रोडवर वैदश्री सोसायटीतील कार मार्टसमोर इंद्रजीत राजेंद्र सजोज (वय 20) हा मॅकेनिक रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या वाहतुकीस धोका व अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन पार्क करून त्याची दुरुस्ती करताना आढळून आला. त्याच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version