तीन बांगलादेशी महिलांवर पोलिसांची कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळंबोलीत बेकायदापणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांविरोधात कारवाई केली आहे. चमिली पप्पुहशमेर सिखडे, (38), हमिदा शुकरीशौदत गाझी, (27) व सलमा मोशियर शेख, (29) अशी कारवाई केलेल्या बांगलादेशी महिलांची नावे असून या सर्व महिला घरकाम करणार्‍या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीर वास्तव्यास असणार्‍या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास दिले होते. त्यानुसार एएचटीयु पथकाच्या एपीआय अलका पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. रामा नामा भगत चाळ, सेक्टर 03, कळंबोली गाव येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असून ते सकाळी कामावर निघून जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने, पथकासह सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी 03 महिला सापडल्या.

या महिलांकडे पथकास भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागदपत्रे न मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, घुसखोरीच्या मार्गाने भारत बांगलादेश सिमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून व स्थानिक मुलकी अधिकार्‍यांचे पूर्व परवानगीशिवाय व कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भारतात प्रवेश करून त्या राहत असल्याचे उघडकीस आले.

Exit mobile version