नाकाबंदी दरम्यान पोलिसांना मारहाण

| पनवेल | प्रतिनिधी |

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात नाकाबंदी करीत असणाऱ्या पोलीस अंमलदाराला हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या आगमनावेळी शिवशंभो नाका येथील पोलीस वाहतुक शाखेसमोरील रस्त्यावर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पवार नाकाबंदी करीत होते. त्यावेळी कल्पेश जुगे, प्रणय पाटील, तुळशीराम पवार यांनी या पोलीस अंमलदारांशी सरकारी कर्तव्य बजावत असताना हुज्जत घालून भांडण काढुन शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत ज्ञानेश्वर पवार यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन गुन्हा आरोपींवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Exit mobile version