मुरूडमध्ये पोलिसांनी केले रूट मार्च

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
रमजान ईदच्या सणाच्या पार्श्‍ववभूमीवर मुरुड पोलिस निरीक्षक नितिन गवारे यांच्या नेतृत्वाखाली मुरुड शहरातील ठिकठिकाणी पोलिसांनी रुट मार्च काढला. उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. मुरुड बाजारपेठ, पेठ मोहल्ला, आझाद चौक, एकदरा पुल, कोळीवाडा परीसर व मच्छी मार्केट या मार्गाने पोलिसांनी संचलन केले.
मुरूड पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी रूट मार्च करून कोणत्याही परीस्थिला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, सहाय्यक फौजदार दिपक राऊळ, पोलिस नाईक परेश म्हात्रे, पोलीस नाईक सुरेश वाघमारे आदिसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version