मुरुडमध्ये पोलीस दलाकडून मानवंदना

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयात 75 वा ध्वजारोहण प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ध्वजारोहण करण्यात आले. मुरुड शहरातील प्राथमिक मराठी शाळा, सर एस.ए.हायस्कुल, अंजुमन इस्लाम हायस्कूल, डिग्री कॉलेजचे विद्यार्थीनींनी शिस्तबंद प्रभात फेरी मुरुड बाजारपेठ येथील आझाद चौकात पर्यत काढण्यात आली. त्यानंतर आझाद चौकातील ध्वजारोहण प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. मुरुड तहसीलदार कार्यालयात तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना व नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार राजेश्री साळवी, प्रशासकिय अधिकारी परेश कुंभार, पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढाकरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, संदिप पाटील, प्रमोद भायदे, डॉ. राज कल्याणी, तनुजा गोबरे, उमेश गोबरे, विजय पाटील, विजय सुर्वे, बाळकृष्ण गोंजी, सतेज निमकर, बिलाल, पांडुरंग आरेकर, मंगेश दांडेकर, मुबशीर जमादार, दिपाली दिवेकर, स्नेहा पाटील, राशिद फहीम, विश्‍वास चव्हाण, अजित कारभारी, विजय म्हापुसकर, खुशाल राठोड, इस्माईल शेख, मनोज पुलेकर, रूपेश रेवसकर, दिपक राऊळ, संदिप कोम, महेश भगत, नाना गुरव, पारधी पिरकड, आदिंसह मान्यवर मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.

Exit mobile version