वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या शाळांना सूचना
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस पनवेल शहरात वाहतुकीची समस्या वाढतच आहे, त्यातच पार्किंग सुविधा नसल्याने अनेकठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्किंग केली जात आहेत. अशातच शाळेच्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी हद्दीतील शाळेच्या मुख्याध्यापकांची तसेच स्कुल व्हॅनच्या मालकांची संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वाहतुकीपासून मुक्तता मिळविण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूचना त्यांनी शाळांना दिल्या.
यावेळी संजय पाटील यांनी शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूस सीसीटीव्ही लावणे, स्कूल व्हॅन साठी ग्राउंड वर पार्किंग उपलब्ध करून देणे, स्कूल व्हॅनना कुठे जाता येतात त्याप्रमाणे नंबर देण्याची व लांबचे विद्यार्थी यांना लवकरात लवकर जाण्याची सुविधा करून देणे, शाळेच्या गेट व रस्त्यावर वॉचमन, शिक्षक किंवा शिक्षक ठेवणे, वाहनांची कागदपत्रे अद्ययावत असावीत, वाहन चालकाने बॅच लावावा, तो कुठून व कोणत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करतो याबाबत शाळेने माहिती ठेवावी, शाळेचा टाइमिंग आपसात मीटिंग करून ठरवून घ्यावे जेणेकरून रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा होणार नाही आदी विषयांबाबत या मिटिंगमध्ये संजय पाटील यांनी जनजागृती केली. या बैठकीमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि 20 ते 25 वाहन चालक-मालक उपस्थित राहिले होते.
