कोबिंग ऑपरेशनद्वारे 16 वाहनांवर कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी रायगड पोलिसांनी हाती घेतलेल्या मिशन ऑल आउट अंतर्गत मंगळवारी पोयनाड तसेच जिल्ह्यातील चेकपोस्ट परिसरात कोबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. यात 67 वाहने तपासून 16 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचे बदलत चाललेले स्वरूप या पार्श्वभूमीवर हे संख्याबळ तुलनेत कमी पडते. त्यामुळे आहे त्या संख्याबळात अत्यंत प्रभावी काम करत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी पोलिसाकडून प्रयत्न होत असून घरफोडी, वाटमारी यासह विविध प्रकारांच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी तसेच गुन्हेगारांना कायम वचक राहावा, यासाठी पोलिसांनी मिशन ऑल आउट सुरू केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक असोक दुधे यांच्या आदेशाने ऑल आउट ऑपरेशन रायगड जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले. त्या दरम्यान पेझारी चेक पोस्ट येथे विशेष नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले. नाका-बंदी दरम्यान 67 वाहने चेक करीत 16 वाहनांवर ती कारवाई करण्यात आलेले आहे
येथील संपूर्ण हद्दीत नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली तसेच फरार, हवे असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी कोबिंग ऑपरेशन करण्यात आले.
गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी मोहिमेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आदेशानुसार जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस स्टेशनच्या हद्दीत मिशन राबविले होते. तसेच नाका-बंदी दरम्यान वाहन चालकांनी सीट बेल्ट लावणे, हेल्मेट परीधान करणे अत्यंत गरजेचे आहे. – राहूल अतिग्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पोयनाड