। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मार्च महिना अखेरला जिल्ह्यात उन्हाची काहीली वाढली आहे. हवामान अहवाल अॅवर या आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस तर किमान 21 ते 35 अंश सेल्सिअस इतके नोंदले आहे. सध्या जिल्ह्यात कमालीचा उकाडा जाणवू लागला आहे.त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी नागरिक वेगवेगळे पदार्थ विकत घेत आहेत.
महाड, खालापूर, तळा, पोलादपूर, पेण, कर्जत, अलिबाग व सुधागड या तालुक्यात किमान तापमान देखील 24 अंश सेल्सिअस व त्यापुढे नोंदविले गेले आहे. तापमान वाढीमुळे उकाडा सहन होत नसल्याने शरीराला गारवा आणण्यासाठी अनेक जण थंड पेये, गोळा, कलिंगड, काकडी खाणे पसंत करत आहेत. तर काहीजण फळांचा रस पित आहेत. काही दिवसांनी उन्हाची काहिली वाढणार असल्याने उष्माघाताचा धोका देखील वाढण्याची शक्यता आहे.