जुगारावर अड्ड्यावर पोलिसांची धाड

दहा जणांवर गुन्हा दाखल

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

सेक्टर 7, खारघर येथील जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकत दहा जणांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात 20 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 20 एप्रिल रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पाईपलाईन शेजारील झोपडपट्टी परिसरात असलेल्या कच्च्या कापडाच्या शेडमध्ये सेक्टर ७, खारघर येथे आरोपी गुरुनाथ पांडुरंग मोडेकर आणि जगदीश गोपीनाथ ठाकूर दोघेही रा. कोपरा गाव हे जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या ठिकाणाहून रोख रक्कम जप्त केली.

Exit mobile version