उद्यापासून पोलीस भरती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पोलिस वाहन दलाच्या आस्थापनेवरील चालक आणि शिपाई या पदांसाठी पोलिस भरतीसाठी लेखी परिक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या परिक्षार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी परिक्षाकेंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 81 पोलिस शिपाई आणि 27 वाहन चालक अशा 108 पदांसाठी तब्बल 11 हजार अर्ज आले असून त्यांची लेखी परिक्षा घेण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. शहरातील अरुणकुमार वैद्य हायस्कूल तसेच जेएसएम महाविद्यालयात परिक्षा केंद्र उभारण्यात आले असून बुधवारी 1 हजार 100 विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा होणार असल्याचे समजते.

Exit mobile version