पोलिसांनी सहकार्य करण्यास दिला नकार- इकरार मोदी, तंटामुक्त अध्यक्ष

1960 साली तत्कालिन जिल्हाधिकार्‍यांनी ही जमिन ग्रामपंचायतीकडे वर्ग केली होती. भुमिअभिलेख विभागाकडे तशी नोंदही करण्यात आली आहे. मात्र महसूल विभागाने फेरफार न केल्यामुळे ही जागा नवाबाच्या वारसांच्या नावावर राहिली. कालांतराने नवाबाने त्यांच्या जमिनी विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही.

नागपुर येथील तैजून निसार हसोनजी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बिल्डरने कवडीमोल किंमतीत ही जागा खरेदी केली. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच ग्रामपंचायतीने याबाबत सर्व कागदपत्रे जमा केली. तसेच जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, कोकण आयुक्त यांच्याकडे पत्र व्यवहार केला. त्यावेळी हे प्रकरण चौकशी स्तरावर असल्याचे सांगण्यात आले. असे असताना अलिबाग, माणगाव, मुरुड आदी पोलीस ठाण्याचा फौजफाटा तसेच तहसिलदार व अन्य प्रशासकिय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बिल्डरने जागेत बांधकामाला सुरुवात केली. तसेच महिलांना धक्काबुक्की केली. भांडवलदाराच्या फायद्यासाठी प्रशासकिय यंत्रणेने स्थानिकांचा विचार केला नाही.

Exit mobile version