| मुरूड | वृत्तसंस्था |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा, मुरूड शहर येथे शुक्रवारी सायंकाळी संचलन घेण्यात आले. यामध्ये त्रिपुरा रिझर्व्ह पोलिसांसह 50 जवानांनी ठिकठिकाणी संचलन केले.अलिबाग येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली मुरूड तालुका पोलीस निरीक्षक निशा जाधव यांचे नेतृत्वाखाली राजपुरी गाव कोळीवाडा ते राजपुरी मोहल्ला, एकदरा गाव ते एकदरा पुलावरून मुरूड शहर बाजारपेठ मशीद आझाद चौक, पुरकर नाका, कोळीवाडा, पेठ मोहल्ला, लक्षीखार, दस्तुरी नाका मार्गे दत्तवाडी असा संचलन घेण्यात आले. सॅपत्रिपुरा प्लाटून रिझर्व्ह फोर्सचे 50 जवान आणि मुरूड पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड आणि पोलीस या संचलनामध्ये सहभागी झाले होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन
