मिनीपिकअप टेम्पोसह दोघे ताब्यात
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका मिनी पिकअप टेम्पोमधून दाटीवाटीने जर्सी गाय आणि वासरू यांची वाहतूक करणाऱ्या मद्यपि आणि विना लायसन्स चालकाला आणखी एका इसमासोबत पोलादपूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस हवालदार दिलीप सारंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (दि.1) रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ विशाल भिमराव निकम (27), मुपोजि.सातारा, तर दुसरा धर्मेंद्र नारायण देव (56), सिध्दनाथ वाडी ता.वाई जि.सातारा हे दोघे मिनी पिकअप टेम्पोमधून दाटीवाटीने जर्सी गाय आणि वासरू यांची दाटीवाटीने तसेच पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालाशिवाय बेकायदेशीर वाहतूक करीत होते. यावेळी दोघेही मद्यपान केल्याचे ब्रिथ ऍनालायझरद्वारे तपासणीत निदर्शनास आले तर तपासणीवेळी वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसेन्स आढळून आले नाही. यामुळे पांढऱ्या लाल रंगाची मिनी पिकअप टेम्पो किंमत 5 लाख तर जर्सी गाय 80 हजार रूपये तसेच जर्सी गायीचे वासरू 10 हजार रूपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ठाणे अंमलदार पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक शिंदे हे पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.