सुविधा केंद्रावर 32 कर्मचार्‍यांकडून मतदान

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा मतदारसंघात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनी सुविधा केंद्रावरील मतदान कक्षात मतदान केले. उद्या निवडणुका होत असलेल्या 11 पैकी 9 मतदारसंघातील 32 मतदारांनी सुविधा केंद्रावर मतदान केले. तर या मतदारसंघात गृह मतदान म्हणून संमती देणार्‍या 70 पैकी 62 मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला.

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.13) मतदान होत आहे. या लोकसभा क्षेत्रातील कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांचे मूळ गाव हे कर्जत बाहेरील आहेत. अशा कर्मचार्‍यांचे मतदान सुविधा केंद्रावर घेण्यात आले. राज्यात शिर्डी, अहमदनगर, मावळ, शिरूर, पुणे, रावेर, बीड, नंदुरबार, जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा 11 मतदारसंघात मतदान घेतले जाणार आहे. त्या मतदारसंघात नावे असलेल्या आणि कर्जत तालुक्यात सेवा बजावत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांचे मतदान 11 आणि 12 मे रोजी कर्जत प्रशासकीय भवन येथील सुविधा केंद्र येथे आयोजित केले होते.

गृह मतदानात 62 मतदारांचा सहभाग
कर्जत विधानसभा मतदारसंघात मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 85 वर्षे वयावरील 59 आणि चालता येत नसलेल्या 11 दिव्यांग मतदारांनी गृह मतदान करण्याची संमती दिली होती. त्यातील दिव्यांग 11 तर 85 वर्षे वयावरील 51 अशा एकूण 62 मतदारांनी गृह मतदानाचा लाभ घेवून राज्य निवडणूक आयोगाच्या उपक्रमात सहभागी होत मतदान केले.
Exit mobile version