| पुणे | वृत्तसंस्था |
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान होत आहे. मुक्ता टिळक (कसबा पेठ), लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. कसबा पेठमधून काँग्रेसचे रविंद्र धांगेकर तर भाजपचे हेमंत रासणे हे उभे आहेत. चिंचवडमधून भाजपच्या अस्मिता जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे नाना काठे असा होणार आहे. प्रचारादरम्यान भाजपाने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात शनिवारी कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, रविवारी होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तसेच नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार संपल्यानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.