पनवेल मनपाचे निकृष्ट दर्जाचे काम; वर्षभरात रस्ता खराब

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेकडून ओल्ड पनवेल रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम करण्यात आले होते. एक वर्षही पूर्ण झाले नसतानाच या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याची खडी व डांबर पण निघाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

या रस्त्याने प्रवास करणार्‍या नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतोय. रस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे व गाड्यांचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान होत असल्याने चालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत. हा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्त्या असल्यामुळे गाड्यांची वर्दळ मोठया प्रमणावार असते आणि त्यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता पावसाळाही सुरु झाला आहे त्यामुळे नागरिकांचा प्रवास अजून खडतर झाला आहे.

या बाबतची दखल घेऊन झोपी गेलेल्या पनवेल मनपा प्रशासनाने लवकरात लवकर पावसाळा सक्रीय होण्याआधी घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Exit mobile version