रोनाल्डोविना पोर्तुगालचा विजय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीतही पोर्तुगाल फुटबॉल संघाने सोमवारी मध्यरात्री झालेल्या युरो करंडक पात्रता फेरीच्या लढतीत लक्झेमबर्ग संघाचा 9-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह पोर्तुगालचा संघ ज गटामध्ये सहा विजयांसह 18 गुणांनिशी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. पोर्तुगालकडून गोन्सालो इनासियो (12 वे मिनीट, 49 वे मिनीट), गोन्सालो रामोस (18 वे, 33 वे मिनीट) आणि डिओगो जोटा (57 वे मिनीट, 77 वे मिनीट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. रिकार्डो होर्टा याने 77 व्या मिनिटाला, ब्रुनो हर्नांडिस याने 83 व्या मिनिटाला आणि जोओ फेलिक्स याने 88 व्या मिनिटाला गोल केला. रोनाल्डोवर सध्या निलंबनाची शिक्षा आहे. त्यामुळे त्याची या लढतीत अनुपस्थिती होती.

Exit mobile version