रायगडमधील विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा

| पनवेल | प्रतिनिधी |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या कट्टर शिवसैनिकांची आढावा बैठक मंगळवारी मातोश्रीवर पार पडली. यावेळी झालेल्या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या.

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरातील जवळपास 25 ते 30 पदाधिकार्‍यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सदर बैठकीनंतर या सर्व पदाधिकार्‍यांनी योगेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते भास्कर जाधव यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी पनवेलसह उरण आणि रायगडमधील प्रलंबित प्रश्‍न प्रामुख्याने हाताळण्याची गरज असल्याची भावना योगेश तांडेल यांनी व्यक्त करताच भास्कर जाधव यांनी सांगितले की, आपण यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहोत. तर पनवेलमध्ये गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष उभारी घेत आहे, त्यानुसार आज पनवेलमध्ये जनतेची कामे होणे गरजेचे आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि योगेश तांडेल यांचे काम उत्तमप्रकारे सुरू आहेच मात्र त्या कामाला आमची देखील साथ मिळून पनवेलमध्ये भगवा किल्ला निर्माण करण्याची ताकद आता दाखविली जाणार आहे, असेही भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Exit mobile version