। पनवेल । वार्ताहर ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. तसेच सध्याच्या परिस्थितीत सर्व शिवसैनिक एकजुटीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. यामध्ये 72 शिवसैनिकांनी रक्तदान करून योगदान दिले. यावेळी रामदास पाटील ,भरत पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील,दीपक निकम, एकनाथ म्हात्रे, योगेश तांडेल, विश्वास पेटकर, पराग मोहिते, सुनीत ठक्कर, अच्युत मनोरे, प्रविण जाधव, गुरुनाथ पाटील, शशिकांत डोंगरे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, राहुल गोगटे, सुजन मुसलोंडकर, राहुल टेमघरे, अनिल कुरघोडे उपस्थित होते.