थेट सरपंचपदासाठी पाच
ग्रामविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट
| नेरळ | प्रतिनिधी |
पोटल ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या पोटल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी 31 अर्ज दाखल झाले आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव थेट सरपंचपदासाठी पाच अर्ज दाखल आहेत. दरम्यान, या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप-शेकाप यांची ग्रामविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी निवडणूक होत आहे.
कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी आणि पोटाला या दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी होत आहेत. त्यासाठी नामानकं अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आज दाखल नामांकन अर्ज यांची छाननी करण्यात आली. या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव असून, पाच अर्ज दाखल झाले आहेत. त्यात मीरा सुनील मसने, काजल विनोद श्रीखंडे, प्रियांका कृष्णा जोशी, प्रणाली प्रवीण मसने, रंजना रामदास मसने यांचे अर्ज दाखल आहेत. तर सदस्यांच्या 9 जागांसाठी तीन प्रभागात 31 उमेदवार उभे राहिले आहेत. त्यात प्रभाग एक मधील तीन जागांसाठी 13, तर प्रभाग दोनमधील तीन जागांसाठी 9 आणि प्रभाग तीनमधील तीन जागांसाठी 9 अर्ज दाखल आहेत.
तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पोटल ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना आणि शेकाप यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता, तर त्यात भाजपदेखील सहभागी झाले आहे. या तीन पक्षाच्या ग्रामविकास आघाडीसमोर शिवसेना शिंदे गटाचे आव्हान असणार आहे. नामांकन अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर असून, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.