खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर ते कोप्रोली या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्गावर काही ठिकाणी खडी उखडून जीवघेणे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा प्रवास धोकादायक झाला होता. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी चिरनेरचे माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह येथील नागरिकांनी उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दामोदर पाटील यांच्याकडे केली होती. या बाबतचे वृत्त कृषीवलने मंगळवारी (दि.14) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत उरणमधील सार्वजनिक बांधकाम खात्याने बुधवारी (दि.15) या रस्त्याच्या खड्डे बुजविण्याच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील प्रवासी नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, दैनिक कृषीवलचे माजी उपसरपंच सचिन घबाडी यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच, या कामाची सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचेही घबाडी व येथील नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.

Exit mobile version