जलवाहिनी गळतीमुळे उरण-मोरा मार्गावर खड्डा

। उरण । वार्ताहर ।

नगरपरिषदेच्या उरण शहर ते मोरा या मार्गावरील जलवाहिनीला उरण न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेले रस्त्याचे फेव्हर ब्लॉक उखडल्याने खड्डा ही पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

उरण ते मोरा मार्गाच्या मध्यभागातून नगरपरिषदेची ही जलवाहिनी जात असून बुधवारी या वहिनीला गळती लागली आहे. मात्र अजूनपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोरा व भवरा परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली आहे.

Exit mobile version