वरई-आरवंद रस्त्यावर पुन्हा खड्डे

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील वरई ते आरवंद या भागातील रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून अडीच कोटी रुपये खर्चून बनविण्यात आला होता. मात्र, मागील दोन वर्षात पुन्हा एकदा त्या रस्त्यावर खड्डे पडले असून तेथील रहिवाशी यांचा प्रवास पुन्हा एकदा खड्ड्यातून कायम आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून पोसरी ते आरवंद असा रस्ता आहे. या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते. 2021 मध्ये या रस्त्याच्या कामासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्यावर पुढील काही वर्षे देखभाल दुरुस्ती ठेवण्याचे काम ग्रामसडक योजना करीत असते. दुसरीकड या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडण्याची घटना मागील वर्षी देखील घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्या रस्त्यावर खड्डे पडले असून स्थानिक ग्रामस्थांसाठी त्रासदायक बनले आहेत. वाहनचालकांचा सुरक्षित प्रवास होण्यासाठी हा रास्ता पुन्हा दुरुस्त करावा, अशी मागणी वरईचे माजी उपसरपंच दीपक धुळे यांनी केली आहे.

Exit mobile version