| माथेरान | वार्ताहर |
धुळविरहित रस्त्यांना एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीनेच या प्रदूषण मुक्त माथेरान गावात क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात येत आहेत. परंतु संबधित ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे ब्लॉक लावण्याऐवजी कच्चे ब्लॉक वापरले आहेत.यामुळेे अनेक भागातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल आहेत. वाहतूक करणाऱ्या हातरिक्षा आणि घोडा या प्रमुख वाहनांना त्याचप्रमाणे पायी चालत जाणाऱ्या पर्यटकांना, स्थानिकांसह शालेय विद्यार्थ्यांना खूपच जिकीरीचे बनले आहेत्.
जवळपास 47 कोटी रुपये खर्च करून दस्तुरी ते पांडे रोडपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात येत आहेत. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर उत्तम दर्जाचे ब्लॉक लावण्याऐवजी ठेकेदाराने हलक्या प्रतीचे अत्यंत ठिसूळ ब्लॉक लावल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत .कुठेही पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी उतार नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबत असून चिखलातून प्रवास करावा लागत आहे.रस्त्याच्या कडेला असणारे ब्लॉक सुद्धा निखळून गटारात पावसाने वाहून गेले आहेत आहेत.नगरपरिषदेच्या कार्यालयात हजर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला नोटीस बजावून उत्तम प्रकारे कामे पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात हीच निकृष्ट कामे नगरपरिषदेच्या माध्यमातून पूर्ण करावी लागणार आहेत त्याचा अतिरिक्त भार नगरपरिषदेच्या तिजोरीवर पडणार आहे.सध्यातरी या खड्डेमय रस्त्याबद्दल कुणीही आवाज उठवत नाही परंतु याच रस्त्यावर ई रिक्षा सुरू झाली की आंदोलने, मोर्चे, नगरपरिषदेच्या कार्यालयात निवेदने देण्यासाठी गर्दी तसेच आपले व्यवसाय बंद करण्यासाठी काही विकासाला विरोध करणाऱ्या मंडळींचा प्रामुख्याने पुढाकार असणार आहे तूर्तास तरी सर्वच व्यावसायिक मूग गिळून गप्प बसले आहेत असेही बोलले जात आहे.
आम्ही पायी चालत येत असताना रेल्वे स्टेशन भागातील या ब्लॉकच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यातून आमची सुटकेस ओढून नेणे सुध्दा खूपच त्रासदायक बनलेले असून या रस्त्यावर माझी छोटी मुलगी पडली असून जरी तिला किरकोळ दुखापत झाली असली तरी अन्य कुणी वयस्कर व्यक्ती पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो.आम्ही पन्नास रुपये टॅक्स भरतो त्याप्रमाणे निदान आम्हाला चालण्यायोग्य रस्ते तरी बनवा प्रशासनाने यासाठी काहीतरी उपाययोजना करावी.
वैकुंठ कुलकर्णी, पर्यटक मुंबई