वीज विभागाचे क्रिकेटचे सामने

। नेरुळ । प्रतिनिधी ।
नेरुळ विभागाअंतर्गत मार्च महिन्यातील वीज बिल वसुलीचा ताण कमी करण्यासाठी शाखा अंतर्गत क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले. या सामन्यात एकूण 10 संघ सामील झाले होते. नेरुळ विभागातील प्रत्येक शाखा कार्यालयाने एक संघ या सामन्यात उतरवला होता. या सामन्याचे उद्घाटन भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता तथा प्रमुख पाहुणे गणेशकर यांनी भुषविले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजी राव गायकवाड यांनी भूषविले. या स्पर्धेसाठी कार्यकारी अभियंता नेरुळ,पामबीचव सीबीडी बेलापूर हे उपलब्ध होते.या स्पर्धेत विशेष पुढाकार शशिकांत म्हात्रे व त्यांचे सहकारी कामगार यांनी घेतला.

Exit mobile version