सुरेश गणेशकर यांनी दिल्या सूचना
। नेरळ । वार्ताहर ।
महावितरणच्या कर्जत उपविभागात सतत वीज देयके यांची थकबाकी दिसून येत आहे त्यामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी कर्जत येथे येऊन या विभागातील सहायक अभियंता आणि शाखा अभियंता यांना थकबाकी वसुलीबाबत सूचना दिल्या.
महावितरणच्या पेण मंडळातील कर्जत उपविभातील लाईन स्टाफ व शाखा अधिकार्यांची बैठक कर्जत उपविभागात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत मुख्य अभियंता यांनी कर्जत उपविभाग अंतर्गत येत असलेल्या आठ शाखेतील सर्व लाईन स्टाफ आणि शाखा अभियंत्यांना सूचना केल्या. यावेळी पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी, पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, कर्जत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके आणि आठ शाखेतील अभियंते आणि लाईन स्टाफ उपस्थित होते.
महावितरणची थकबाकी वाढत चाललेली असून 2021-2022 या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना चालू असून थकबाकी वसुल करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या महावितरणच्या सर्व परिमंडलात थकबाकी वसुली आणि थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात चालू आहे. कर्जत उपविभागात बैठक घेऊन वीजबिल वसुलीवर भर देण्यासाठी सर्व अधिकारी व लाईन स्टाफ यांना सूचना करण्यात आल्या.