विद्युत वाहिनीच्या तारा चोरीला

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील तेलवडे येथील स्मशानभूमी रस्त्यावरील विद्युत वाहिनी तारा चोरीला गेल्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रमोद ताबंडकर यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत तेलवडे हद्दीमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा तेलवडे ते स्मशानभूमी रस्त्यावर स्ट्रीट लाईटचे एकुण 8 पोल बसविले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये त्या पोलवरील काही विद्युत वाहिनी तारा तुटुन पडल्या होत्या. काही अज्ञात इसमांनी बंद अवस्थेत असलेली विद्युत वाहिनी तारा तोडून चोरून नेल्या आहेत. तसेच त्या ठिकाणी असलेले विद्युत वाहिनी तारांचे बंडलसुद्धा चोरी केलेले आहेत तरी याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात निवेदनातून तक्रार करण्यात आली आहे.

Exit mobile version