तळा नागरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता

राष्ट्रवादी १० तर शिवसेना ४
। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून सर्वच पक्षांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली. तळा नागरपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आले आहे.

तळा नागरपंचायत प्रभाग क्र.१ मधून ग्रीष्मा गणेश बामणे(राष्ट्रवादी), प्रभाग क्र. २ मधून नरेश बाळू सुर्वे (शिवसेना), प्रभाग क्र. ३ मधून यामिनी जनार्दन मेहत्तर(राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ४ मधून सिराज महमद शरीफ खाचे(अपक्ष शिवसेना पुरस्कृत), प्रभाग क्र. ५ मधून दिव्या निलेश रातवडकर (भाजप), प्रभाग क्र. ६ मधून नेहा नमित पांढरकामे(शिवसेना), प्रभाग क्र.७ मधून मंगेश गणपत पोळेकर(शिवसेना पुरस्कृत अपक्ष बिनविरोध), प्रभाग क्र.८ मधून सारिका महेश गवळी(राष्ट्रवादी), प्रभाग क्र.९ मधून पुष्पा हरिश्चंद्र नागे(राष्ट्रवादी), प्रभाग क्र.१० मधून मंगेश रामचंद्र शिगवण (राष्ट्रवादी), प्रभाग क्र.११ मधून चंद्रकांत महादेव रोडे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र.१२ मधून अविनाश रवींद्र पिसाळ(राष्ट्रवादी), प्रभाग क्र.१३ मधून अर्चना विजय तांबे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र.१४ मधून रितेश रविंद्र मुंढे (भाजप पुरस्कृत अपक्ष), प्रभाग क्र.१५ मधून अस्मिता चंद्रकांत भोरावकर(राष्ट्रवादी), प्रभाग क्र.१६ मधून सुरेखा नामदेव पवार(भाजप), प्रभाग क्र.१७ मधून माधुरी शैलेश घोलप(राष्ट्रवादी) हे निवडून आलेल्या उमेदवारांची नावे आहेत.

Exit mobile version