पहिल्याच पावसात वीज गायब

। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे विभागातील वीज पहिल्याच पावसात रात्री 9 ते 12 गायब झाल्याने सर्व ग्राहक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अलिबाग तालुक्यातील लोणघर ते चिंचवली व नारंगी ते हाशिवरे येथे रिमझिम पावसात वीज गायब झाली. तिथल्या लोकांना खूप त्रास झाला.
या परिसरातील चिंचवली व हाशिवरे सेक्शनमधील कर्मचारी हे तांत्रिक कारणामुळे वीज गेल्यावर लवकर येण्यासाठी प्रयत्न करतात. तरी या परिसरात गेल्या दोन महिन्यापासून वीज पुरवता अधून-मधून खंडित व्हायची तरी आता पण असेच सुरु असल्याने येथील भागात वीज पुरवठा कोणत्या कारणामुळे खंडित होत आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.

Exit mobile version