पार्थचे दमदार शतक

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागच्या जगदीश ढगे क्रिकेट अकॅडमीचा सलामीचा फलंदाज पार्थ महेश म्हात्रे याने स्पर्धेतल पाहिलं दमदार शतक आपल्या नावावर नोंदवलं. न्यू पनवेल क्रिकेट अकॅडमी संघाविरुद्ध खेळताना त्याने 125 चेंडूंमध्ये 13 चौकार ठोकत 102 धावा काढल्या. नेणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना न्यू पनवेल क्रिकेट अकॅडमी संघांनी 40 षटकांच्या अखेर 8 गडी बाद 306 धावांचा डोंगर रचला. अर्णव पाचकूडे 39, मधुर पवार 37, मिलान चौरसिया यांनी 35 धावा काढल्या.

अलिबाग कडून ओम वार्डे आणि मानस राऊत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 306 धावाना प्रत्युत्तर देताना अलिबागच्या जगदीश ढगे क्रिकेट अकॅडमी संघाचा सलामीचा फलंदाज पार्थ म्हात्रे यांनी 102 धावा काढत शतक ठोकलं, ओम भगतने 43 धावा केल्या. अलिबाग संघाचा डाव 40 षटकांत 4 गडी गमावत 222 धावांवर आटोपला. न्यू पनवेलकडून मधुर पवार यांनी 2 गडी बाद केले. न्यू पनवेल क्रिकेट अकॅडमीने सामना 84 धावांनी जिंकला. अष्टपैलू खेळाडू मधुर पवारला सामनावीर, पार्थ म्हात्रेला स्टार सलामीवीर तर मंथन पाटीलला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पोयनाड ग्रा.पं. सदस्य सुनील पाटील, झुंझारचे सचिव किशोर तावडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version