‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत पनवेल महापालिकेची प्रभात फेरी

| पनवेल | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान 13 ते 15 ऑगस्टदरम्यान महापालिकेच्यावतीने राबविले जात आहे. याअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका अधिकारी-कर्मचार्‍यांची प्रभातफेरी काढण्यात आली.

17 ऑगस्टला अकरा वाजता स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. याच्या जनजागृतीसाठी पनवेल महानगरपालिका अधिकारी-कर्मचार्‍यांची ही प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे , सहाय्यक आयुक्त वैभव विधाते यांच्यासह अधिकारी व सर्व विभागप्रमुख, पालिकेच्या शाळांमधील शिक्षक,विद्यार्थी, सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version