रायगडात प्रभातफेरी, विविध स्पर्धाद्वारे तिरंगा सप्ताह

मातोश्री टिपणीस महाविद्यालयाची रॅली
। नेरळ । प्रतिनिधी ।

मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात हर घर झेंडा.. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. यानिमित्ताने सामूहिक राष्ट्रागीत गायन करण्यात आले. तसेच वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 14 विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवीला.या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक कुमारी. वंदना थोराड- एस.वाय.बी.ए, द्वितीय क्रमांक कुमारी. विना सुपेकर-टी.वाय.बी.कॉम आणि तृतीय क्रमांक कुमार. सागर सपकाळे या विद्यार्थ्यांनी मिळविले.

बुधवारी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. र् कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महाविद्यालयातील प्राध्यापक सागर मोहिते, प्राध्यापक. संतोष तुरुकमाने प्राध्यापिका. स्नेहल देशमुख प्राध्यापक.अमोल सोनावणे,प्राध्यापिका सोनम गुप्ता, प्राध्यापक. अनंत घरत,प्राध्यापक.विकास घारे, प्राध्यापक.वैभव बोराडे, प्राध्यापक.धनंजय कोटांगळे, ग्रंथपाल.जागृती घारे.आरती आवटे, कु. दिपक जोशी यांचा सहभाग होता.

17 ऑगस्ट पर्यंत महाविद्यालयात गीत गायन,समूह गीत गायन,पोस्टर स्पर्धा,रंगवली स्पर्धा,आरोग्य शिबीर यांच्यासह संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे.त्याचवेळी डॉ एस आर रंगनाथन यांची जयंती, भारताचा अर्थव्यवस्था आणि अमृत महोत्सव तसेच जनजागृती रॅली असा भव्य उपक्रम राबविला जात आहे. तर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान या विषावर इतिहास संशोधक वसंत कोळंबे हे कर्जत तालुक्यातील हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्याबाबत बोलणार आहेत.

Exit mobile version