प्रभाविष्कारला ‌‘पंचतत्व‌’ने रंग

पीएनपी होली चाईल्ड स्कूलचा गुणदर्शन कार्यक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या ‌‘प्रभाविष्कार‌’ अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील होली चाईल्ड सीबीएसई स्कूलचा ‌‘पंचतत्व‌’ विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम निसर्गाचे संगोपन करा, आपले भविष्य सुरक्षित करा या विषयांवर पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून अलिबागमधील वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे आणि डॉ. विनायक पाटील हे उपस्थित होते.


यावेळी होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, ॲकॅडमिक डायरेक्टर राजश्री पाटील, वरिष्ठ लेखापाल प्रसाद मुनगेकर, मनिषा रेलकर, अंकित भानुशाली, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह इतर मान्यवर व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारचे सादरीकरण केले.

Exit mobile version